उत्तुंग, अभेद्य विशाळगड
पन्हाळगडचा वेढा अत्यंत शिताफीने आणि चातुर्याने फोडून शिवराय विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले. जिगरबाज मावळ्यांच्या मदतीने त्यांनी केलेली आखणी यशस्वी झाली. या प्रसंगी वीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर फुलाजीप्रभू देशपांडे स्वराज्य रक्षणाच्या जिद्दीने प्रेरित होऊन धारातीर्थी पडले. हे रणकंदन ज्याने अनुभवले तो विशाळगड आणि आपल्या शाहूवाडीचा परिसर आपण जगासमोर अभिमानाने मांडूया.
- मंदार वैद्य, कोल्हापूर.


कोल्हापूरच्या पश्चिमेला अंदाजे ७५ किलोमीटर वर विशाळगड हा अभेद्य दुर्ग वसला आहे. हा किल्ला अणुस्कुरा आणि आंबा या दोन घाटांच्या मध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकण प्रांतातून विशाळगड वर चढाई जवजवळ अशक्यच आहे. पूर्वेकडून विशाळगड कडे जाण्याचे मार्ग देखील घनदाट अरण्यातून जातात.
इ. स. ११९० रोजी या प्रांतातील राजा भोज (दुसरा) याने विशाळगड बांधल्याचे उल्लेख आहेत. याच कालावधीत त्यांनी आपली राजधानी कोल्हापूर हुन पन्हाळ्यास आणली आणि आणि कोकण घाटमाथ्यावस असलेल्या मोक्याच्या ठिकाणी पुरातन आणि वहिवाटीच्या घाटमार्गांचे रक्षण करण्यासाठी दुर्गांची उभारणी केली.
इतिहासात हा किल्ला किशीगीला, भोजगड, खिलगिला, खेळणा इ. विविध नावानी ओळखला जात होता.
पुढे हा किल्ला यादवांच्या ताब्यात आला. यादवांचा अस्त होता होता दक्षिणेत बहामनी सत्ता उदयास आली. त्यांनी दख्खन आणि कोकण प्रांतावर आपली सत्ता विस्तारण्यास सुरुवात केली. विशाळगड देखील ताब्यात घेतला.
सविस्तर माहिती लवकरच...
Visit our other ventures
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2025. All rights reserved.